औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्यूट औरंगाबाद यांच्या सामांज्यस करार झाला असून, त्यानुसार जिल्ह्यात २५ व्हेंटिलेटर आणि ४५ ऑक्सिजन सिस्टीमची उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था पुणे आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्युट औरंगाबाद यांनी कोरोना काळातील गांभीर्य समजून घेऊन सीएसआर फंडमधून जिल्हा प्रशासनाला एकूण २ कोटी १३ लाख रुपये किंमतीचे मेडिकल साहित्य देऊ केले आहे. यामध्ये २५ व्हेंटिलेटर (१कोटी ६८ लाख ), ४५ ऑक्सिजन सिस्टीम (४५ लाख) यांचा समावेश आहे.
यासंबंधीच्या सामांज्यस करारनाम्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकीदेवी ग्रामविकास संस्थाचे चेयरमन सी.पी. त्रिपाठी आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा वर्मा यांनी स्वाक्षरी केली आहे. हे साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी वापरण्यात येणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou