सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या वखारभाग मध्ये भेळ खाण्यासाठी मालक गाडीतून उताराला असता सदरच्या गाडीतून काच फोडून दहा लाख रुपये रक्कम अज्ञातांनी लुटल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित गाडीच्या चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने चालकानेच मालकाच्या 3 लाख 14 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी चालक लक्ष्मण मारुती जावीर, शक्ती बाबासो मोरे आणि अमर दत्तात्रय संकपाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वसीम नायकवडी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. शुक्रवारी जयसिंगपूर येथील व्यवहार करून 6 लाख 50 हजार रुपये एका कापडी पिशवी मध्ये घेवून सांगलीकडे आले होते. वखारभाग येथे आले असता मित्रासमवेत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाडीतील रोख रक्कमची पिशवी चोरीला गेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना वखारभाग आणि जयसिंगपूर येथील ज्या ठिकाणी व्यवहार झाला अशा 25 ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले.
त्यात असे निदर्शनास आले की गाडीतील ड्रायव्हर लक्ष्मण जावीर हा संशयित असून त्याने संशयितरीत्या काही फोन केले आहेत. त्यानंतर जावीर व इतर संशयित मोबाइल नंबरच्या लोकांना ताब्यात घेवून चौकशी चालू केली असता जावीरचा मित्र शक्ती बाबासो मोरे आणि अमर दत्तात्रय संकपाळ यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, जावीर याच्या सांगण्यावरून वखारभाग येथे गाडी आल्यानंतर नायकवडी व त्याच्यासोबत असणारे त्यांचे मित्र हे भेळ खाण्यासठी गेले असताना जावीर याने इनोव्हा गाडी लॉक करण्याच्या बहाण्याने पाठीमागे राहून रोख रक्कमेची असलेली बॅग देवून रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली.