सांगली | तासगाव तालुक्यातील डोर्ली येथील भिवाघाट मार्गावर दुचाकी गाड्यांची समोरासमोर धडकून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यामध्ये बस्तवडे येथील तरुण प्रणव हरिराम पाटील जखमी झाला आहे. तर दूसरा द्राक्ष कामासाठी आलेला परराज्यातील तरुण हा जखमी झाला आहे.
परराज्यातील तरुण हा डोर्लीकडून तासगावंकडे जात होता तर प्रणव हा तरुण आरवडेकडून बस्तवडेकडे जात होता. जुनी डोर्ली जवळ येताच दोन्ही गाड्याचा समोरासमोर धडक झाली व यात दोन तरुण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन्ही गाड्याचा समोरून चक्काचुर झाला आहे.
प्रवण यास कुटुंबीयांनी तात्काळ खाजगी गाडीतून उपचारासाठी नेऊन गेले तर तर दुसरा तरुण हा बराच वेळ ऍम्ब्युलन्स साठी घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून होता. त्यामुळे घटनास्थळावरील लोक खेद व्यक्त करीत होते. रात्री उशिरापर्यंत तासगावं पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली नव्हती.