Wednesday, October 5, 2022

Buy now

दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार तर दुसरा जखमी

सातारा | वाई-जांभळी रस्त्यावर धोम गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. तानाजी नवलू शेलार (वय- 32, रा. खावली, ता. वाई) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी ज्ञानदेव चंद्रकांत सणस (वय- 24) हे आपल्या दुचाकीवरुन आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना दुपारी त्यांची दुचाकी साडेचारच्या सुमारास धोम गावच्या हद्दीत आली. त्यावेळी समोरुन भरघाव वेगाने येणार्‍या दुचाकीने सणस यांच्या दुचाकीला धडक दिली. दोन्हीही दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले.

अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तानाजी शेलार यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक एस. डी. वाळुंज करीत आहेत.