नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे गेल्या 19 महिन्यांपासून जगभरात विनाश झाला आहे. दररोज हजारो लोकं मरत आहेत. तर लाखो लोकांना या धोकादायक विषाणूची लागण होत आहे. मृतांच्या संख्येबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. असं म्हटलं जात आहे की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात बरेच देश योग्य आणि खरी आकडेवारी सादर करत नाहीत. जगातील बहुचर्चित मासिक ‘द इकॉनॉमिस्ट’ ने असा दावा केला आहे की, जगातील अनेक देश कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल योग्य माहिती देत नाहीत. असा दावा केला जात आहे की, आतापर्यंत संपूर्ण जगभरात 70 लाख ते 1.3 कोटींपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
इकॉनॉमिस्टच्या वृत्तानुसार केवळ आफ्रिका आणि आशियाच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनीही मृत्यूबद्दल योग्य माहिती दिलेली नाही. मासिकाने मशीन-लर्निंग मॉडेलच्या माध्यमातून हा दावा केला आहे. तसे, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आतापर्यंत कोरोनामुळे 38 लाख 30 हजार लोकं मरण पावले आहेत. तर आतापर्यंत जगभरात 17 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आकडेवारी काय म्हणते ?
आशियातील अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इकॉनॉमिस्टने असा दावा केला आहे की, आतापर्यंत येथे 24 ते 71 लाख लोकांचा बळी गेला आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये अधिकृत मृत्यूची संख्या 6 लाख आहे. तर मासिकाने येथे 15-18 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. युरोपमधील अधिकृत आकडेवारी दहा लाख आहे. तर असा दावा केला जात आहे की 15-16 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.
भारताचे काय?
इकॉनॉमिस्टने असा दावा केला आहे की,येथे दररोज 6 ते 31 हजार मृत्यू होत आहेत. तर सरकारी आकडेवारीमध्ये असे म्हटले जाते की, दररोज 4 हजार मृत्यू होतात. भारत सरकारने हे दावे फेटाळले आहेत. या अहवालानुसार अनेक गरीब देश मृत्यूची खरी आकडेवारी लपवत आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा