सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्वाची अथवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील निवडणूक निर्णय अधिकारी शंकर महादेव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे.
त्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी मतदान तर 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा प्राथमिक शिक्षण बँकेचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असल्याचे दिसत आहे. प्राथमिक शिक्षण सहकारी बँक ही शिक्षकांची सहकारी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बँक समजली जाते शिक्षक संघ आणि समिती यांच्यामध्ये होणारी पारंपारिक लढत हा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये राजकीय उत्सुकतेचा आणि प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे.
शिक्षक सहकारी बँकेच्या राजकारणामध्ये अजूनही काही गट सक्रिय झाल्या असून त्यांच्या माध्यमातूनही तिसऱ्या पॅनलचा पर्याय देण्याचे हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संघ आणि समिती या दोघा गटांमध्ये नेत्यांची शिक्षकांच्या गाठीभेटी सुरू झाले आहे.