कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी
गेल्या ६ महिन्यापासून काले गावातील एस.टी सेवेच वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. याचा नाहक त्रास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवाशांना व ग्रामस्थांना होत होता. एसटी प्रशासनाच्या नाहक त्रासाला कंटाळून
अखेर काले ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी कराड आगाराचे आगारप्रमुख जे.डी पाटील यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले.
काले मसूर ही शटल सेवा पुन्हा सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर आगार प्रमुखांनी ४ तास प्रवासी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून अखेर प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन घेतले.
काले ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी ४ तास ठिय्या आंदोलन करत अखेर आपल्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करून घेतल्या व या लेखी मागण्यांवर कार्यवाही नझाल्यास येत्या आठ दिवसात रास्ता रोको करण्याचा इशारा विद्यार्थिनी दिला