सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
”सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे” असं सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विटा येथील कार्यक्रमात एका केलं. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांवरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, तसेच जे नियमित कर्ज भरतात. त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार असल्याचं यावेळी बच्चू कडूंनी सांगितलं. विटा येथे आयोजित नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान ”सन २०१५ साली सेवा हमी कायदा अस्तित्वात आला, परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झालेली नाही. ७ दिवसांवर फाईल अडवणाऱ्या एकाही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. चांगला अधिकारी असेल तर त्याला डोक्यावर घेऊ पण ७ दिवसांवर फाईल अडवून सर्वसामान्य जनतेची अडवणूक कराल तर गाठ बच्चू कडूशी आहे, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे”. असा गर्भित इशारा राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी विटा येथे बोलताना दिला.
.