धक्कादायक!! रुग्णालयाचा खोटेपणा कोरोनाग्रस्त महिलेने आणले चव्हाट्यावर (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये कोवीड पॉझिटिव्ह महिलेला उपचाराची तात्काळ गरज असताना व रुग्णालयात खाली बेडने भरलेला अख्खा हॉलच असतानादेखील डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत तीन तास ताटकळत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिलेच्या संघर्षाने शेवटी तिला दाखल करण्यात आले, त्यानंतर त्या महिलेने एक व्हिडिओ बनवत हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.सरकारी रुग्णालयात असे प्रकार घडत आहे. स्थानिक प्रशासनाला ही मंडळी जुमानत नसेल तर आता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा याचाच फायदा घेत येत्या काळात गोरगरिबांची सर्रास लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रुग्णालयाचा खोटेपणा कोरोना रुग्ण महिलेने आणला चव्हाट्यावर

कोरोना रूग्ण महिलेने व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती अशी की, शहरातील चिकलठाणा भागात राहणारी राधा इंगळे या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेला मेलट्रॉन सेंटर येथे उपचार घेण्याचे सांगण्यात आले.ती तेथे संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास गेली मात्र बेड रिकामे नसल्याचे करण देत तेथे डॉक्टरांनी तिला दाखल करून न घेता घरी होम आयसोलेट होण्याचा सल्ला दिला. मात्र छोटे घर, घरात मुले, शिवाय शुगर देखील असल्याने तीला घरी उपचार घेणे शक्य न्हवते त्यामुळे तिने सुमारे तीन तास त्या डॉक्टरांना विनवणी केली.मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं नाही.

शेवटी तिने रात्री पाऊने अकराच्या सुमारास राज्य सभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडे मदतीसाठी फोन लावला. कराड यांनी डॉक्टरांना विनंती केल्यानंतर महिलेला दाखल करण्यात आले. खरे मात्र जेंव्हा ती महिला रुग्णालयाच्या आत गेली आणि तेथील दृश्य पाहून त्या कोरोना ग्रस्त महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. तेथील एक हॉल चक्क रिकाम्या बेडने भरलेला होता.त्या परिसराचा महिलेने व्हिडिओ बनविला व तो व्हायरल झाला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेबाबत आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment