हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील बहुसंख्य प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘मनी हाईस्ट’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता या सर्व प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांची प्रतीक्षा करण्याचा अवधी संपणार आहे. आपण सारेच जाणतो जगभरातून अनेको चाहते ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन कधी येणार, याकडे नजर खिळवून बसले होते. कारण हा सीजन या वेबसीरिजचा शेवटचा सीझन आहे. त्यामुळे उत्सुकताही परिसीमेची आहे. मात्र अखेर नेटफ्लिक्सने या वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. विशेष म्हणजे, ‘मनी हाईस्ट’चा पाचवा सीझन दोन भागांत असणार आहे. त्यामुळे नक्कीच हा सीजन आधीच्या सिजनसारखाच खास आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
https://www.instagram.com/p/CPQiV4InF_W/?utm_source=ig_web_copy_link
नेटफ्लिक्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सीरिजचा टीजर पोस्ट केला आहे. बँक आॅफ स्पेन’मध्ये पोलिसांनी प्रोफेसरच्या टोळीला पूर्णतः घेरले असून चहूबाजूंनी गोळीबार सुरू आहे, असा प्रसंग या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट ५’च्या प्रदर्शनाची तारीखही सोबतच जाहीर केली आहे. ‘मनी हाईस्ट’ या वेब सिरीजचा पाचवा सीझन याचवर्षी येतोय. ह्याचा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ रोजी तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘मनी हाईस्ट’चे या आधीचे चारही सीझन अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. चोरी करताना घातलेले मास्क आणि ‘बेला चाओ’ हे गाणे तर अत्याधिक लोकप्रिय झाले.
https://www.instagram.com/p/CPQqzLEMF83/?utm_source=ig_web_copy_link
‘मनी हाईस्ट’ ही मूळ स्पॅनिश भाषिक वेबसीरिज आहे. नेटफ्लिक्सवर हि वेब सिरीज इंग्रजी भाषेत अन्य प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. अनोख्या आणि रंजक कथानकाच्या जोरावर या वेबसीरिजने संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले आहे. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा एक भला मोठा प्लॅन आखतो, असे या वेब सीरिजचे मूळ कथानक आहे. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सीझन प्रेक्षकांना झुलवत आणि एकाच ठिकाणी खिळवून ठेवले होते.
https://www.instagram.com/p/CMXvUI0jNrf/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्तेने हि सीरिज ५ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. पण काही कारणास्तव ही तारीख लांबणीवर टाकण्यात आली आहे. हि वेब सिरीज याआधी सर्वप्रथम केवळ स्पॅनिश टीव्हीवर दाखवण्यात आली होती. तेव्हा ही सीरिज अक्षरशः फ्लॉप ठरली. यानंतर मेकर्सने दुस-या सीझननंतर ही सीरिज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे नेटफ्लिक्सने ही सीरिज खरेदी केली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली.