हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमीक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत आहे. भारतातही या व्हेरियंटचे रुग्ण आढळत असून यापैकी काही रुग्ण महाराष्ट्रातही आहेत. दरम्यान आज ब्रिटनमध्ये ओमिक्रोनच्या पहिला बळी गेलेला आहे. याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या नवीन प्रकाराच्या लक्षणांबद्दल बरीच चर्चा आणि अंदाज बांधले जात आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाचा हा प्रकार चिंता वाढवणारा असा उल्लेख केला आहे. विविध संस्थांनी कोरोनाच्या या प्रकाराच्या संसर्गाच्या दराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज ब्रिटनमध्ये एका ओमिक्रोनच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत ट्विटकरीत मृत्यूची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, नवीन प्रकाराचा परिणाम देखील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आणि “सर्वोत्तम गोष्ट” लोक करू शकतात ती म्हणजे त्यांचे बूस्टर जॅब. लंडनमधील लसीकरण क्लिनिकला नुकतीच भेट दिली. लोकांनी ओमिक्रॉन एक सौम्य प्रकार आहे ही कल्पना बाजूला ठेवली पाहिजे. दरम्यान यावेळी पॅडिंग्टन, वेस्ट लंडन जवळच्या भेटीदरम्यान जॉन्सन याच्याशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ओमिक्रॉन हॉस्पिटलायझेशन तयार करत आहे आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ओमिक्रॉनसह कमीतकमी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. म्हणून मला वाटते की ही एक प्रकारे विषाणूची सौम्य आवृत्ती आहे, मला वाटते की आपण एका बाजूला सेट करणे आवश्यक आहे आणि लोकसंख्येद्वारे तो वेगवान गती ओळखतो.”
Boris Johnson: At Least One COVID Omicron Death Confirmed in #UK https://t.co/ZhMavqFgma
— Sputnik (@SputnikInt) December 13, 2021
जगातील 59 देशांमध्ये ओमिक्रॉनने हातपाय पसरले तरी या व्हेरिएंटची लागण होऊन अजून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. मात्र, आज ब्रिटनमध्ये एका ओमिक्रोनच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाल्याचे पहायला मिळालेली आहे.