हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे लवकरच भुयारी मार्गातील सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्पा सुरू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कामाचाच भाग म्हणून कॉर्पोरेट अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या (Subway Metro) कामाची सातत्याने पाहणं केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाची गती पाहता भुयारी मार्गावरील पहिल्या टप्प्याच्या चाचण्या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील.
खरे तर, कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेची कामे लवकरच पूर्ण होतील अशी अपेक्षा वर्तवली जात होती मात्र काही कारणांमुळे या कामाला विलंब झाला. मात्र आता कामाचा वेग वाढवला असून 3 टप्प्यात मार्गिका सुरू करण्यासाठी एमएमआरसीनेचे प्रयत्न सुरू आहेत. मागील महिन्यातच 95 किमी प्रतितास वेगावर मेट्रोच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यात प्लॅटफॉर्म स्क्रीम डोअर, ट्रॅक्शन आणि रुळ अशा इतर चाचण्यांचा ही समावेश होता. मात्र आता सर्व चाचण्या मे महिन्यातच पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरसीने आखले आहे.
मेट्रो 3 मार्गिका सुरू होणार कधी?
मेट्रो गाड्यांसह इतर सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून सुरू करण्यात येईल. त्यानंतर तीन ते चार महिन्यातच मेट्रो मार्गेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या मेट्रो सुरू झाल्यानंतर आरे-बीकेसी मार्गावर एकूण नऊ मेट्रो धावतील. यातील दोन मेट्रो ट्रेन देखभाल आणि स्टँडबायकरता ठेवल्या जातील. या मेट्रोंची वेळ साधारण सकाळी 6 ते रात्री 11 अशी असेल.