हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेच्या (RRTS Train) दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरच्या 17 km मार्गाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून जून 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर सुरु करण्यात येणार आहे.
साहिबाबाद ते दुहाई डेपो पर्यंत सुरु होणार RRTS :
सामान्यांसाठी सुरु होत असलेल्या 17 km मार्गमध्ये एकूण 5 स्थानाकातून ही ट्रेन सुरु होणार आहे. ही ट्रेन साहिबाबाद स्थानकातून सुरु होऊन दुहाई डेपो पर्यंत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे. सध्या चालवण्यात येणाऱ्या ट्रेनमध्ये एकूण 6 डब्बे असणार आहेत. ज्यामध्ये एक प्रीमियम कोच असेल व उर्वरित स्टॅंडर्ड कोच असणार आहेत. स्टॅंडर्ड कोच मधील एक कोच महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
WIFI, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा :
RRTS गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी त्यांचे सामान सीटच्यावर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक सीटवर WIFI आणि मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये हॉस्पिटलचे स्ट्रेचर बसेल अशी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून आपत्कालीन स्थिती मध्ये RRTS च्या मार्गांवरील आजारी व्यक्तीस लवकर दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करता येऊ शकेल.
हरवलेली वस्तू प्रवाश्याला परत मिळवता येणार :
प्रवाशाचे सामान स्टेशन परिसरात हरवले तर संबंधित व्यक्ती स्टेशन कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संपर्क करू शकतो. तसेच 08069651515 वर कॉल करुन त्यांना हरवलेल्या वस्तूंची माहिती मिळू शकते. RRTS स्थानकातील ग्राहक सेवा केंद्रातून ही हरवलेली वस्तू प्रवाश्याला परत मिळवता येऊ शकेल .