राज्यातील पहिली तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी चाचणी

0
204
Satara Police Recruitment Transgender Sameer Shaikh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यात राज्य सरकारच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी अर्ज देखील केले आहेत. विशेष म्हणजे प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील यांची मैदानी चाचणी घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यात पार पडत असलेल्या पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तीन तृतीय पंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले आहे. साताऱ्यात या तीन जणांच्या भरतीसाठी 70 हून अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

100 मीटर, 800 मीटर धावणे, गोळा फेक अशी मैदानी चाचणी संबंधित तीन तृतीय पंथीय उमेदवारांची घेण्यात आली. या मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.