ह्रदयद्रावक! कपडे धुताना तलावात मुलगी बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह पाच जणीही बुडाल्या 

0
130
bhandara crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

लातूर – तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन मुली आणि दोन महिला अशा एकूण पाच जणी बुडाल्याची घटना शनिवारी जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा येथे घडली आहे. मयत ह्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आहेत. राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (19, सर्वजण रा. रामापूरतांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (21), अरुणा गंगाधर राठोड (25, दोघेही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम, जि. परभणी) असे मयत पाच जणींची नावे आहेत.

 

ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. येत्या दोन दिवसांत साखर कारखाना बंद होणार असल्याने ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे दिसू लागल्याने एकापाठोपाठ एकजण अशा चौघींनी वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, पोहता येत नसल्याने या पाच जणीही बुडाल्याने मृत्यू झाला.

 

आपल्या कुटुंबातील नातेवाईक बुडत असल्याने जवळच असलेल्या 10 वर्षीय मुलाने पाहिले आणि त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्या पाच जणींचा मृत्यू झाल्याचे किनगाव पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here