नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रेंच ओपनच्या (French Open) दुसऱ्या सेमीफायनलदरम्यान एका पर्यावरणवादी कार्यकर्तीने एक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने ते पूर्णपणे चुकीच्या पद्धीतीनं केलं. यामुळे उपस्थित सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा सगळा प्रकार अचानक घडल्याने मैदानात एकच गोंधळ उडाला होता.
नेमकं काय घडलं?
मुलगी बेकायदेशीर घुसल्याचं दिसताच तातडीनं येऊन मुलीच्या गळ्यातील जाळ्यातून बांधलेली साखळी खेचली. काही वेळानं पुन्हा सामना सुरू झाला. यावेळी महिला आंदोलकांच्या टी-शर्टवर ‘आमच्याकडे 1028 दिवस शिल्लक आहेत’ असं लिहिले होतं. आंदोलन करणाऱ्या तरुणीचे नाव अलीजी असून तिचे वय 22 वर्षे आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाआहे.
A woman attached herself to the net pic.twitter.com/LJYrrYHyN6
— Jomboy Media (@JomboyMedia) June 3, 2022
मुलगी का विरोध करत होती?
ती मुलगी डर्नियर रिनोव्हेशन नावाच्या चळवळीशी संबंधित आहे. ती हवामान बदलाविषयी निदर्शनं करत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर फ्रान्सनं हवामान बदलावर काम केलं नाही. तर 1028 दिवसांनंतर काहीही शिल्लक राहणार नाही. आंदोलक अलीजी हि पर्यावरणवादी असल्याचे समजत आहे. तिने आपल्या एका संदेशात जागतिक नेते जगाला अशा भविष्याकडे नेत आहेत जिथे फ्रेंच ओपनचे (French Open) आयोजन करणं देखील शक्य होणार नाही आणि सर्व काही संपेल, असे लिहिले आहे.
हे पण वाचा :
अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
कोरोनाचं प्रमाण वाढतंय योग्य खबरदारी घ्या; केंद्र सरकारचे महाराष्ट्र सरकारला पत्र
मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!
मी सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढणार; गोपीनाथ गडावरून पंकजा मुडेंचे सूचक विधान
आता खरी वेळ सुरु झाली आहे ; अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच संजय राऊतांचा भाजपला इशारा