प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! सांगली-मिरज मार्गे जाणारी ‘गोवा एक्सप्रेस’ कोकण रेल्वे मार्गाने धावणार

Goa Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वास्को स्थानकावरून सांगली मिरज मार्गे दिल्लीसाठी धावणारी “वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन” गोवा एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गे वळवण्यात आली आहे. सांगली-मिरज दरम्यान सुरू असलेल्या मार्ग दुहेरीकरण्याच्या कामामुळे हा बदल करण्यात आला आहे.

कोणत्या मार्गे धावणार

रेल्वे विभागाने सांगितले आहे की, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते वास्को द गामा दरम्यान 17 जानेवारी रोजी सुटणारी गाडी कोकण रेल्वे मार्गाने वळवण्यात आले आहे. त्यामुळे आता ही गाडी पुणे, कल्याण, पनवेल, रोहा, रत्नागिरी, मडगाव मार्गे वास्को-द-गामाला जाणार आहे. तसेच 18 जानेवारी रोजी सुटणारी 12 779 गाडी वास्को-द-गामा येथून निघाल्यानंतर मडगाव रत्नागिरी, रोहा, पनवेल, कल्याण, पुणे जंक्शनपर्यंत वळवण्यात आलेल्या मार्गाने धावेल. तसेच पुढे आल्यानंतर ती तिचा नियमित मार्ग पकडेल

मार्ग बदलण्याचे कारण काय?

सध्या मध्य रेल्वेच्या हद्दीत सांगली मिरज दरम्यान दुहेरीकरणणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हादुपदरी मार्ग वापरात आणण्यासाठी या कामावर जास्त भर देण्यात आला आहे. तसेच, परिणामी वास्को-द-गामा -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस अप आणि डाऊन या फक्त दोन फेऱ्यांसाठी वळवली गेली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये ही गाडी सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, रायबाग, घटप्रभा बेळगावी, लोंढा जंक्शन, कॅसलरॉक, कु्लेम आणि सॅनवरडेम अशी कोणतीही स्थानके घेणार नाही.