हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लहान मुलांना सर्दी खोकला झाला की त्यांना अँटी-कोल्ड ड्रग दिले जाते. परंतु या औषधावर भारताच्या औषध नियामकाने बंदी घातली आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अँटीकोल्ड ड्रग कॉम्बिनेशन्स देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कफ सिरफच्या वापरामुळे जगभरामध्ये 141 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच भारताच्या औषध नियामकाने या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
2019 पासून भारतामध्ये घरगुतीरित्या उत्पादित विषारी खोकला सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षामध्ये गॅम्बिया, उझबेकिस्तान आणि कॅमेरूनमध्ये किमान 141 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यामुळे भारतातून होणाऱ्या औषधांच्या निर्यातीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या सर्व बाबींनी निदर्शनात घेऊन तसेच अँटी-कोल्ड ड्रग फॉर्म्युलेशनच्या वापराबद्दल चिंता निर्माण झाल्यानंतर सल्लामसलत करण्यात आली होती.
ज्यानंतर anti-cold medicine नियामकाने 18 डिसेंबर रोजी एक आदेश जारी करत म्हणले की, फिक्स्ड-ड्रग कॉम्बिनेशन्स (FDCs) 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यात येऊ नये. खरे तर, FDC क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन असल्यामुळे ते सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी सिरप किंवा गोळ्यांमध्ये वापरले जातात. परंतू, anti-cold medicine जागतिक आरोग्य संघटना पाच वर्षाखालील मुलांना खोकला आणि सर्दीच्या आजारावर उपचार करण्यासाठी ओव्हर-द-काउंटर कफ सिरप किंवा औषधे वापरण्याची शिफारस करत नाही.