महिलांसाठी सरकारची उत्तम योजना ! फक्त 100 रुपयांपासून करा गुंतवणूक आणि मिळवा लाखात रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahila Samman Savings Certificate : मोदी सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असते. याचा फायदा देशातील लाखो महिला घेत आहेत. जर तुम्हीही मोदी सरकारच्या अशाच एका योजनेची वाट पाहत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून मोठा पैसे कमवू शकता.

याबाबत 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विशेष गुंतवणूक योजना सादर केली होती. ही विशेषत: महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने काही काळानंतर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्राविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. यामध्ये तुम्ही 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला मोठा परतावा कसा मिळू शकतो याचीही माहिती मिळेल. याबाबत तुम्ही सविस्तर जाणून घ्या.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 काय आहे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक छोटी बचत योजना आहे. यामधे कोणत्याही प्रकारची क्रेडिट रिस्क नाही. ही खास योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी सुरू केली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र पात्रता

महिला सन्मान बचत पत्र योजना केवळ महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कोणत्याही मुलीच्या किंवा महिलेच्या नावावर गुंतवणूक करता येते. इच्छा असल्यास, महिला किंवा अल्पवयीन मुलीचे पालक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ठेव मर्यादा

100 रुपयांच्या पटीत किमान ठेव रक्कम रु. 1,000 आहे.
यामध्ये जास्तीत जास्त ठेव रक्कम 2 लाख रुपये आहे.
या योजनेअंतर्गत, एखादी महिला किंवा मुलीचे पालक विद्यमान खाते उघडल्यानंतर किमान 3 महिन्यांच्या आत दुसरे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडू शकतात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र देणार्‍या बँका कोणकोणत्या आहेत?

– बँक ऑफ बडोदा
– कॅनरा बँक
– बँक ऑफ इंडिया
– पंजाब नॅशनल बँक
– युनियन बँक ऑफ इंडिया
– सेंट्रल बँक ऑफ इंडिया
– स्टेट बँक ऑफ इंडिया
– पोस्ट ऑफिस

अशा प्रकारे तुम्ही यातील कोणत्याही बँक मध्ये जाऊन तुमची गुंतवणूक करू शकता व सरकारच्या या योजनेचा मोठ्या रकमेत लाभ मिळवू शकता. याबाबत सविस्तर व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

Mahila Samman Saving Certificate - Interest Rate, Benefits, Calculator 2024