औरंगाबाद | सध्या देशभरात लसीकरण मोहीम जोरात मोठयास्तरावर राबविण्यात येत आहे. त्यात शासनाने एका नवीन नियमाची भर घातली आहे. शासनाने कोव्हीशिल्ड लसीच्या पहिला व दुसरा डोस यामध्ये कमीत कमी ८४ दिवस अंतर असणे आवश्यक असल्याबाबत कळविलेले आहे.
त्यानूसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी ८४ दिवस पुर्ण झाल्यावरच दुसरा डोस घेण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे.लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर साठी कोव्हीशिल्ड लसीचा फक्त दुसरा डोस व ४५ वरील वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल.
तसेच आरोग्य सेवा कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर व इतर वयोगटातील नागरिकांनी पहिल्या डोससाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे