हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्हातील परतवाडामध्ये काल सायंकाळी दोन लहान मुली साधारण २ वर्षे व ३ वर्षे एका युवकाला हरवलेल्या स्थितीत आढळल्या. त्याने लगेच याची माहीती ईतरांना दीली तर काही सामाजीक कार्यकर्त्यानी पोलीसांना यांची माहीती दीली. व या मुलींच्या आजीला अवघ्या तासाभरात शोधले.
सायंकाळी १० ची वेळ असल्याने परतवाडा पोलीसांच्या चमूने दोनीही मुलींना ऊपजील्हा रुग्णालयात तापासणिकरीता नेले. मात्र या दोनीही मुलींचे आईवडील कोन व कोठे आहेत. याचा पेच काही सुटेना. पोलीसांनी परीसरात गस्त घालन्यास सुतवात केली. मात्र प्रत्येक ठीकाणी अपयश येत होत. शेवटी परतवाडातील अंजनगाव चौकाजवळ एका महीलेला वीचारले असता तीने या दोघींना ओळखले आठवडीबाजारात या आजीकडे राहतात असे तीने सांगीतले .
तेव्हा पोलीसांनी सुटकेचा नीश्वास सोडला . तेथे जाऊन आजी शेवंता कासदेकर हीच्या या दोनीही नाती होत्या तर त्यांची आई या जगात नसल्याचे पोलीसांना सांगन्यात आले. तर वडील दारू पीऊन या दोनही मुलींना घेऊन फीरत असल्याचे समजले, भीक मागून खाने हीच यांची दीनचर्या असावी असे पोलीसांच्या लक्षात आले. मात्र काहीही असो दोन लहानग्या मुलींना सोडून गेलेल्या आईवडीलां वीषई चीड व मुलींना पाहून अनेकांना मायेचा पाझर फूटला होता. ही कामगिरी परतवाड्याचे psi गोपाल गोळे , psi सीमा सदार ,कॉन्स्टेबल सतीष जामोटकर चालक अंकूष धोटे यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’