‘इंडियन आयडॉल १२’च्या होस्टने साधला अमित कुमारांवर निशाणा

0
75
Aaditya Narayan_Amit Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल १२ या सिंगिंग रिऍलिटी शो वर प्रचंड टीकांची बरसात झाली आहे. किशोर कुमार स्पेशल एपिसोड दरम्यान या शोबाबत अश्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला ज्यामुळे शोचा टीआरपी घसरला आहे. याचे मुख्य कारण या वीकेण्ड स्पेशलला उपस्थित गेस्ट किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार ठरले. त्यांनी शोबाबत असे काही वक्तव्य केले कि शोची प्रतिमा काही क्षणातच ढासळली. एका मुलाखतीत, स्पर्धक कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे आहे, असे मला सांगितले गेले होते. जे मला सांगितले तेच मी केले, असे अमित म्हणाले होते. नुकतेच शो चा होस्ट आदित्य नारायण याने पुन्हा एकदा अमित कुमार यांच्यावर थेट निशाणा साधल्याचे पुढील प्रोमोत पाहायला मिळते आहे.

https://www.instagram.com/tv/CPH3t-hqY-s/?utm_source=ig_web_copy_link

अमित कुमार यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्यानंतर शोचा होस्ट आदित्य नारायणने त्यांना चांगलीच खरीखोटी सुनावली होती. मात्र यानंतरही शोचे मेकर्स काही शांत झालेले दिसत नाहीत. आता आदित्य पुन्हा एकदा अमित यांच्यावर निशाणा साधताना दिसणार आहे. या शोच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला़ आहे. या एपिसोडमध्ये कुमार सानू, अनुराधा पौडवाल व रूप कुमार राठोड हे गेस्ट म्हणून सहभागी होणार आहेत. प्रोमोमध्ये या एपिसोडमध्ये तिन्ही गेस्ट शोच्या स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतात. या आधारावर आदित्य तिन्ही गेस्टला प्रश्न विचारतो.

https://www.instagram.com/tv/CPH3t-hqY-s/?utm_source=ig_web_copy_link

आदित्य म्हणतो, ‘मी सानू दा, रूप कुमार राठोड व अनुराधाजींना एक प्रश्न विचारू इच्छितो की, त्यांनी मनापासून स्पर्धकांचे कौतुक केले की आमच्या टीमने करायला सांगितले म्हणून ते कौतुक करताहेत?,’. खरतर आदित्य यावेळी अमित कुमार यांच्या नावाचा साधा उल्लेखही करत नाही. पण समझनेवालों को इशारा काफी है..! या प्रोमोवर आता अमित कुमार काय उत्तर देतात..हे अत्यंत उत्कंठतावर्धक आहे. पण आदित्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून मेकर्स पुन्हा एकदा शोचा टीआरपी ओढण्याच्या प्रयत्नांत बुडाले आहेत हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here