औरंगाबाद – बाहेर फिरायला गेलेल्या इंजिनिअर आणि नोकरीवर गेलेल्या रेल्वे विभागातील लोको पायलटचे दिवसाढवळ्या घर फोडून चोरट्यानी घरातील रोख रक्कम, दागिने लंपास केल्याची घटना सातारा परिसरात घडली आहे.चोरी करणारे दोन आरोपी सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.स्वप्नील विठ्ठलसिंग राजपूत व रघुनाथ गराय असे चोरी झालेल्या घरमलकांची नावे आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, राजपूत हे इंजिनिअर आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते सकाळी म्हैसमाळ येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून संध्याकाळी जेंव्हा ते घरी आले तेंव्हा त्यांचा घराची कडी तोडल्याचे त्यांना दिसले.संशय आल्याने त्यांनी सातारा पोलिसांना घटनेची माहिती दिली.घराची पाहणी केली असता घरातील कापटची तिजोरी फोडण्यात अली होती व त्यामधील रक्कम असलेला गल्ला चोरट्यानी लंपास केला. घरात मौलवण वस्तू नसल्याने चोरट्यानी तेथून काढता पाय घेतला. मात्र चोरटे एवढ्यावरच थांबले नाही. राजपूत यांच्या घराजवळील शिवकृपा अपार्टमेंट ला लक्ष केले. चौथ्या मजल्यावर राहणारे गराय हे रेल्वे विभागात लोको पायलट आहेत. ते नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास चोरट्यानी चौथ्या मजल्यावर जाऊन गराय यांच्या घराची कडी तोडून घरातील एक टोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन महागड्या घड्याळ, चार ते पाच हजार रुपये रोख असा साहित्य लंपास करण्यात आला आहे.
चोरीची सर्व घटना सोसायटी मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. त्यामध्ये दोन चोरटे दिसत आहे. अशी माहिती गराय आणि राजपूत यांनी दिली. तक्रारदार यांना पोलिसांनी बोलावले असून जबाजबाब घेतला जात आहे.दुपार पर्यंत सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला न्हवता.