औरंगाबाद | हुंड्या अभावी अनेक लग्न मोडलेले आपण बघितले असतील पण औरंगाबाद येथील रामनगर इथे 31 नखी कासव अन लेब्रो कुत्रा न दिल्याने लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. साखरपुडा होऊन सव्वादोन लाख रुपये आणि सोन्याची अंगठी घेऊन मुलीला नोकरी लावून देतो, म्हणत दहा लाख रुपये, कासव, लेब्रो कुत्रा, यासह अधिकची रक्कम न दिल्याने लग्नाला नकार दिला.
याप्रकरणी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वीटभट्टी व्यवसायिक अनिल मगनराव सदाशिवे (55, रा.गल्ली क्र.2,रामनगर) यांच्या मुळीच लग्न नाशिक येथील तरुणाशी ठरला होता. यासंबंधी रवींद्र चराटे, पूनम चराटे, लता चराटे,आकाश चराटे,माधुरी चराटे, (रा.डायमंड कॉलनी,नाशिक रोड आणि संतोष उमले (रा.बाळापूर,जि. अकोला) यांनी सदाशिवेंकडून दोन लाख अकरा हजार आणि सोन्याची अंगठी घेतली.
त्यांनतर मुलीला नोकरी लावून देतो असे म्हणत त्यांनी दहा लाखांच्या रकमेसह, 21 नखी कासव, काळ्या रंगाचा लेब्रो कुत्रा आणि आणखी पैश्यांची मागणी केली. परंतु सदाशिवेकडून ही मागणी पूर्ण न झाल्याने चराटे यांनी लग्नाला नकार दिला. सदाशिवेंना फसवणूक होत असल्याचे समजताच त्यांनी उस्मानपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.