आदर्शवत : केसुर्डी गाव कारभाऱ्यांनी केला स्त्रीचा सन्मान, अन् पायपीट थांबली

Kesurdi Gram Panchayat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
नायगाव (ता. खंडाळा) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. सरपंच व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील 30 शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींची पायपीट थांबणार आहे.

केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागायचा. मुलांची होणारी गैरसोय केसुर्डी गावचे सरपंच गणेश ढमाळ यांच्या लक्षात आली, मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत आणि शाळे पर्यंतचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी ढमाळ यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीने सायकल बँक हा उपक्रम सुरू केला. या शाळकरी मुलींना पुरविण्यात आलेल्या सायकली, त्यांचे या ठिकाणचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडे राहणार असून त्यानंतर गावातून नायगाव अथवा इतरत्र जाणाऱ्या मुलींकडे ही सायकल हस्तांतरीत होईल. थोडक्यात याचा लाभ या लाभार्थ्याकडून त्या लाभार्थ्याकडे असाच होणार आहे.

यावेळी उपसरपंच आकाश खडसरे, सदस्या सुरेखा ढमाळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक किरण शिंदे, मुख्याध्यापक रमेश यादव, नायगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकरे, दादासाहेब ढमाळ, माजी उपसरपंच आनंद ढमाळ, गिरजोबा शेंडगे, नवनाथ ढमाळ, निलेश कोळपे, दशरथ जाधव, अनिकेत येलगुडे, शरद ढमाळ, उत्तम ढमाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.