व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अंडरवर्ल्डची भाषा विधीमंडळात हे दुर्देवी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

अंडरवर्ल्डची भाषा आता विधीमंडळात आलेली आहे. खोके वगैरे हे कोण करतय, कुणी घडवलं हे फार दुर्देंवी आहे. महाराष्ट्रातील जनता सर्वकाही पहाते आहे. भाजपाला लोकशाही संपवायची आहे. पक्ष संपवायचे धोरण हे भाजप आणि आरएसएसचे आहे की असा हल्लाबोल आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देशातील लोकशाही धोक्यात असून केवळ काॅंग्रेसच लोकशाही वाचवू शकते. परंतु भाजप पहिल्यांदा छोटे- छोटे पक्ष संपविण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर काॅंग्रेसमुक्त भारत अशी त्यांनी घोषणा केली आहेच. त्यामुळे त्यांना पहिल्यांदा पक्ष अन् नंतर लोकशाही संपुष्टात आणायची असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आम्ही अनेक वर्षे सत्तेत होतो, परंतु कधी पक्ष संपवायला सत्तेचा दुरूपयोग केला नाही. परंतु आता भाजपचे नेते बोलत आहेत. केवळ एकच पक्ष देशात ठेवायचा. त्यामुळे विरोधक संपावयाचे म्हणजे लोकशाही संपुष्टात आणायला कोणताही अडथळा राहणार नाही. त्यामुळे त्यांचा अजेंडा स्पष्टच आहे, अशी टीका आ. चव्हाण यांनी केली.