व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चहाचे जास्तीचे सेवन शरीराला घातक; पहा काय आहेत दुष्परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हे आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात आवडते पेय आहे. अनेक जणांना तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी चहा पिल्याशिवाय चैनच पडत नाही. अनेक जणांना तर चहाचे इतके व्यसन लागते की दिवसातून ५-६ वेळा चहा लागतोच. पण जस आपण प्रत्येक गोष्टीचा जास्त अतिरेक करतो तसे त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे चहा पिताना आपणास थोडा वेळ बर वाटत पण त्याचे जास्तीचे सेवन शरीराला नुकसान पोचवतात.

चहा पिण्याचे नुकसान-

चहामध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपली मेंदूची शक्ती कमी होऊन आपली विचार करण्याची क्षमता कमकुवत होते. म्हणजेच तुम्हाला चहाचे व्यसन लागते आणि जोपर्यंत चहा मिळत नाही तोपर्यंत तुमचा मेंदू नीट काम करत नाही असे आपण म्हणू शकतो.

चहा पिल्याने पोटाची पचनशक्ती कमी होते आणि आपल्याला पित्ताचा त्रास होण्यास सुरुवात होते. याशिवाय गॅसची समस्याही उद्भवते.

दोन पेक्षा जास्त वेळा चहा पिल्याने दातांवर पिवळंसर डाग पडतात. त्यामुळे दाताला कीड लागण्याची शक्यता असते.

चहाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्याला भूकही लागत नाही. कारण आपण जास्त चहा पिल्यामुळे आपली जेवणाची इच्छा नष्ट होते आणि अनके वेळा आपण जेवण करायचो टाळतो.

जास्त चहा प्यायल्याने सतत लघवी होते. त्यामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात आणि हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो. याशिवाय त्यात भरपूर फ्लोराइड देखील असते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात

चहाचे जास्तीचे सेवन केल्याने आपल्याला निद्रानाशच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त चहा पिल्यामुळे आपल्या शरीरात कैफिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही. त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीरास अधिक चहा पिणे हे हानिकारक ठरू शकते.

जास्त प्रमाणात चहा पिल्याने त्यातील मधील टॅनिक ऍसिडमुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. टॅनिक ऍसिडमुळे उलटी किंवा डोकं दुःखण्याचा त्रास होऊ शकतो.