सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. कल्याण काळे सोलापूर आणि माढा या दोनी मतदार संघातील प्रभावी नेते आहेत. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांना ओळखले जाते.
काँग्रेसमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवू शकलो नाही. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याने कल्याण काळे यांनी सांगितले. तसेच पक्षात आपली गुसमत होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.अनेक वर्ष पक्षाने फायदा घेतला मात्र आता जनतेच्या सेवेसाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे तर मढ्यातून संजय शिंदे हे लोकसभा निवडणूक लढणार आहेत.मात्र कल्याण काळे यांच्या भाजप प्रवेशाने या दोघांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.लोकसभेपूर्वी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
इतर महत्वाचे-
मोदींच्या प्रचारसभेत धनुष्यबाण गायब; शिवसैनिक अस्वस्थ
वंचित आघाडीसाठी सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या नावे चर्चांना उधाण
पुतण्या राष्ट्रवादीवरील वर्चस्व वाढवत आहेत – मोदी