औरंगाबाद – मध्यप्रदेश येथून प्रवासी घेऊन औरंगाबादकडे निघालेली आरामबस वळण घेत असताना पलटी झाली.या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास वैजापूर-धुळे महामार्गावरील मनेगाव फाटा येथे घडली.
या अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून (एम.पी.09 एफ.ए. 9910) ही आरामबस सुमारे 22 ते 25 प्रवासी घेऊन औरंगाबादला जात होती. दरम्यान कन्नड शहरातील पाच प्रवासी या बस मध्ये त्यांना कन्नड शहरात उतरणे होते.त्यामुळे पहाटे सव्वा पाचच्या सुमारास वैजापूर- धुळे मार्गावर असलेल्या मनेगाव फाटा येथून बसचालक इस्माईल शेख यांनी वळण घेण्याचा प्रयत्न केला.मात्र,शेखला अंदाज न आल्याने बस पलटली. बस अपघात होताच चालक शेख तेथून फरार झाला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेले गावकरी धावून आले.त्यांनी पोलिसांना माहिती देत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम केले.दरम्यान शिऊर ठाण्याचे साह्ययक निरीक्षक निलेश केळे, जाधव,पी पी पवार,धनेदर, विष्णू जाधव यांनी बस मधील सर्व 22 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
या मधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांना कन्नड रुग्णालयात दोन रुग्णवाहिकेच्या मदतीने हलविण्यात आले.सर्व जखमींची परिस्थिती स्थिर आहे. तर बसचा सहचालक अब्दुल जब्बार यांच्या हाताला देखील गंभीर जखम झाली आहे. पोलीस दुपारपर्यंत क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचा प्रयत्न करीत होती.या प्रकरणी बस चालकां विरोधात शिउर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.