हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीने मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला चाप बसला आहे. पेट्रोलच्या किंमतीत दररोज वाढ होत असून गाडी किती आणि कशी चालवावी हाच प्रश्न सर्वाना पडला आहे. मात्र पेट्रोलच्या या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी एका पट्ट्या ने अनोखा जुगाड केल्या असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे या व्हिडिओत-
@sunilpatilsakal यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत दुचाकीस्वार एक व्यक्ती त्याच्या पत्नी सोबत पेट्रोल पंपा वर पेट्रोल टाकण्यासाठी थांबल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या दुचाकी गाडीला 1 बैलगाडी जोडली आहे आणि त्या गाडीत तब्बल 5-6 बायका आरामात बसलेल्या दिसत आहेत. म्हणजेच या पट्ट्याने दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून 7-8 व्यक्तींना फिरवण्याची सोय केली.
ही आयडिया कशी वाटली…#petrolPrice #Kolhapur #pune #mumbai #maharstra #india pic.twitter.com/W7ojy1YlLW
— SUNlL P. PATIL (@PatilSunilSakal) April 13, 2022
त्यामुळे पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या तरी मला काय फरक पडत नाही असे तर त्या व्यक्तीला म्हणायचे नसेल ना?? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र हा जुगाड करणारा पट्ट्या नेमका कोण आहे आणि हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
दरम्यान, राज्यात पेट्रोल- डीझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 120 रुपये झाली असून अजूनही दिवसेंदिवस दरवाढ सुरूच आहेत. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील वाढ झाल्याने महिलांचे बजट कोलमडले आहे.