पुणे | जर कंपनीमध्ये कामाला जायचे असेल तर कर्मचाऱ्यांनी दर 15 दिवसानंतर आरटीपीसीआर किव्वा अंटीजेन चाचणी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. पण यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे शहर परिसरातील जवळपास 5 लाख कामगारांना दार 15 दिवसाला टेस्ट करण्यासाठी काही यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. ही यंत्रणा ना खाजगी कंपनीवल्यांकडे आणि ना शासनाकडे आहे.
अर्थचक्र थांबू नये म्हणून शासनाने उद्योग आणि खाजगी कार्यालये वीकेंड लॉकडाऊन मध्येही सुरू ठेवण्याची परवानगी दिली. पण त्यासाठी कर्मचाऱ्यांची दर 15 दिवसाला करोना तपासणी करणे बंधनकारक आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास 16 लाख कामगार आहेत. त्यातील जवळपास 8 लाख कामगार हे 45 वर्षाखालील आहेत. 3 लाख कर्मचारी सद्ध्या घरून काम करीत असून त्यापैकी 5 लाख सद्ध्या प्रत्यक्ष कामावर जात आहेत.
जवळपास 5 लाख कामगारांची दर 15 दिवसाला करोना तपासणी करण्याची शासनाची क्षमता नाही. पुणे शहरात दररोज जवळपास 20 हजार आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. त्यातील 3 हजार चाचण्या या पुणे महापालिका तर 17 हजार चाचण्या या खाजगी क्षेत्राच्या हद्दीत होत आहेत. पण सद्ध्या 5 लाख तपासण्या करण्याची शासन आणि खाजगी क्षेत्रात कोणाचीच क्षमता नसल्याचे समोर आले आहे.