नवी दिल्ली । सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 3 लाख कोटी रुपयांहून अधिकने घसरली. शेअर बाजारातील प्रचंड विक्रीमुळे टॉपच्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केट कॅप 3,09,178.44 कोटी रुपयांनी घसरली. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स गेल्या आठवड्यात 1,836.95 अंकांनी किंवा 3.11 टक्क्यांनी घसरला. भू-राजकीय तणावादरम्यान जागतिक बाजारातील विक्रीमुळे स्थानिक शेअर बाजारही खाली आले.
SBI ची मार्केट कॅप
गेल्या आठवड्यात टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची मार्केट कॅप वाढली. आठवडाभरात SBI ची मार्केट कॅप 18,340.07 कोटी रुपयांनी वाढून 4,67,069.54 कोटी रुपयांवर पोहोचली.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), HDFC बँक, इन्फोसिस, ICICI बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., HDFC, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांच्या मार्केट कॅपमध्ये समीक्षाधीन आठवड्यात घट झाली.
TCS मध्ये झाली घट
रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 96,512.22 कोटी रुपयांनी घसरून 15,79,779.47 कोटी रुपये झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फटका बसला. TCS ची मार्केट कॅप 53,488.29 कोटींच्या तोट्यासह 13,65,042.43 कोटींवर घसरली.
इन्फोसिसची मार्केट कॅप 42,392.63 कोटी रुपयांनी घसरून 7,08,751.77 कोटी रुपये आणि HDFC बँकेची मार्केट कॅप 8,11,061.12 कोटी रुपयांनी घसरून 31,815.01 कोटी रुपये झाली.
आयसीआयसीआय बँक
बजाज फायनान्सची मार्केट कॅप 30,333.64 कोटी रुपयांनी घसरून 4,14,699.49 कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप 16,291.53 कोटी रुपयांनी घसरून 5,42,407.86 कोटी रुपये झाली. भारती एअरटेलची मार्केट कॅप 15,814.77 कोटी रुपयांनी घसरून 3,93,174.23 कोटी रुपयांवर आली.
रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे
HDFC ची मार्केट कॅप 13,319.96 कोटी रुपयांनी घसरून 4,56,102.42 कोटी रुपये आणि हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केट कॅप 9,210.39 कोटी रुपयांनी घट होऊन ती 5,36,411.69 कोटी रुपयांवर आली.
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.