Wednesday, June 7, 2023

म्यानमारमधील सत्तांतरानंतर सैन्य सरकारने घातली फेसबुकवर तात्पुरती बंदी

यांगून । देशात बंडखोरीनंतर सैन्यदलाविरोधात सुरू झालेल्या प्रतिकारांदरम्यान म्यानमारच्या नवीन लष्करी सरकारने फेसबुकवर तात्पुरती बंदी घातली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक म्यानमारमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि सत्ताधारी सरकार बहुतेक घोषणा त्यावरच करायचे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना फेसबुक वापरण्यास अडचण येऊ लागली, असे युजर्सनी सांगितले.

त्याच वेळी मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर ‘टेलिनोर म्यानमार’ यांनी एका निवेदनाद्वारे याची पुष्टी केली की, त्यांना संचार मंत्रालयाकडून फेसबुक तात्पुरते बंद करण्याच्या सूचना आल्या आहेत. मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याने या निर्णयाबद्दल त्यांना काळजीही वाटत असली तरी आपण त्यांच्या आदेशांचे पालन करू असे ते म्हणाले.

फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, “म्यानमारमधील टेलिकॉम प्रोव्हायडर्सना फेसबुक तात्पुरते थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सेवा पुन्हा सुरू करावी जेणेकरुन म्यानमारची लोकं त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी संपर्क साधू शकतील आणि त्यांच्यापर्यंत महत्वाची माहिती पोहोचवू शकतील.

म्यानमारमध्ये सोमवारी सैन्याने सैन्याच्या बळावर देशाचा ताबा घेतला आहे. राज्य सल्लागार ऑंग सॅन सू की यांच्या पक्षाने म्हटले आहे की,”त्यांना नजरकैदेत ठेवले गेले आहे.” सैन्याने म्हटले आहे की,”ऑंग सॅन सू की यांनी निवडलेले नागरी सरकार हटवण्यामागील एक कारण असे होते की, कथित व्यापक निवडणुकांच्या अनियमिततेच्या आरोपांची योग्य चौकशी करण्यात ते अपयशी ठरले. आता आणीबाणीच्या परिस्थितीत एका वर्षासाठी ते राज्य करतील आणि त्यानंतर निवडणुका घेतील, ज्यामध्ये जिंकणारे सरकार स्थापन करतील.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.