हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कायम वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. आता ते पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण त्यांची भेट घेण्यासाठी राजभवनात एक मॉडेलमुळे होय. राजभवनात मॉडेलने राज्यपालांच्या खुर्चीसोबत काढलेला फोटो व्हायरल झाला आहे.
राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची मॉडेल मायरा मिश्रा हिने राजभवनात जाऊन नुकतीच भेट घेतली. यावेळी तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मॉडेलने शेअर केलेले फोटो मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ट्वीट केलं असून यावरून यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
ठीकाण राजभवनही बाई कोण ?
अभिनेत्री आणि माॅडेल राजभवनात काय करतेय ?राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही ?@mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/gmhQWiO3KN— Manoj B Chavan waterman (@ManojBChavan5) December 7, 2022
चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?” असा सवाल मनसे नेत्याने केला आहे. दरम्यान, मनसेच्या ट्वीटनंतर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.