फलटण प्रतिनिधी। अनमोल जगताप
सुखी जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपल्याला मिळालेला एक प्रसाद आहे, असे समजूनच वाचूयात, असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केले. विद्यावैभव प्रकाशन व ब्राह्मण बिझनेस सेंटर फलटण शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सुखी जीवनाचा मूलमंत्र या डॉ. प्रसाद जोशी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद जोशी, बकुळ पराडकर, प्राचार्य रविंद्र येवले, स्वानंद जोशी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, डॉ. प्रसाद जोशी हे आमच्या हक्काचे डॉक्टर आहेत. सुखी कस रहावं, यावर बोलण्या इतपत मी मोठा नाही. पण मी सुखी राहण्यासाठी कधी काय करावं? याच मूल्यमापन करतो. राजकारण हे स्ट्रेस फुल आहे. मी सुखी आहे की नाही माहीत नाही. पण, मी दुःखी मात्र जरुर नाही. डॉक्टरांचे हे पुस्तक म्हणजे आपल्याला मिळालेला एक प्रसादच आहे, अस समजून ते पुस्तक वाचुयात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ. प्रसाद जोशी, प्राचार्य रविंद्र येवले व स्वानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. शुभांगी बोबडे यांनी स्वागत केले. बकुळ पराडकर यांनी प्रास्ताविक केले. या वर्षी विद्यावैभव प्रकाशन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशन करण्याचा माझा मानस आहे, असे पराडकर यांनी स्पष्ट केले.