जगातील सर्वात प्रदूषित शहरे भारतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आयक्यूएअर एअरव्हिज्युअल आणि ग्रीनपीस संस्था यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राजधानी क्षेत्रातील गुडगाव हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. आज प्रकाशित झालेल्या नवीन अहवालानुसार भारतात सर्वात वाईट प्रदूषण असलेल्या २० पैकी १५ शहरांचा समावेश आहे.भारताची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या बाबतीत ११ व्या स्थानावर आहे.

सर्वाधिक प्रदूषण असलेल्या १० शहरांपैकी सात शहरे भारतात आहेत, तर एक चीनमध्ये आहे आणि दोन पाकिस्तानमध्ये आहेत. भारतीय शहरात गुडगाव, गाझियाबाद, फरीदाबाद, भिवडी, नोएडा, पटना आणि लखनऊ या शहरांचा सर्वाधिक जास्त प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो. तसेच चीन मधील होतांन तर पाकिस्तानातील लाहोर आणि फैसलाबाद या शहरांचा समावेश आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पीएम २.५ प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि श्वसनविषयक तसेच दमा यांसारखे आजार उद्भवण्याचा धोका जास्त असतो. म्हणून प्रदूषित शहरांचा अभ्यास करताना पीएम च्या संख्येवरून केला आहे.

 

इतर महत्वाचे –

नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

चहाची उधाारी थकल्याने सीएचे कार्यालय फोडले; आरोपीकडुन पावणे दोन लाख हस्तगत

मेळघाटातील वाघीणीचा नैसर्गिक मृत्यू

Leave a Comment