पहिली असताना दुसरी बायको केल्याने वडिलांकडून मुलाचा खून

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण तालुक्यातील पिंप्रद या गावात पहिली बायको असताना दुसरीबरोबर लग्नाची गाठ बांधल्याच्या कारणावरून वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले यास पोलिसांनी दोन तासांत अटक केली. त्यास न्यायालयाने 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सूरज सिकंदर भोसले (वय 30 रा. पिंप्रद) याने पहिली बायको असतानाही दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर लग्नाची गाठ बांधल्याने त्याचे वडील सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले (रा. पिंपरद) यांच्या मनात सूरज याच्याविषयी राग होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील वडरी आळीतील घरासमोर सिकंदर भोसले याने त्याचा मुलगा सूरज भोसले याच्यावर कुऱ्हाडीने डोक्‍यात व पायावर वार केले. यामध्ये सूरज हा मृत पावला. त्याची पत्नी दामिनी हिस जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबतची फिर्याद मृत सूरज भोसले याची पत्नी दामिनी भोसले (वय- 25, रा. पिंप्रद) हिने दिली. याची माहिती मिळताच दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group