साताऱ्यातील जावळीतील जवानाची जम्मूत हत्याच;आरोपी सहकारी जवानाला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा झाला असून, त्यांची हत्या झाली असल्याची धक्कादायक माहिती एक वर्षानंतर समोर आली आहे. जवान प्रथमेशवर जम्मू येथे त्यांच्याच सहकाऱ्याने एके 47 रायफलमधून गोळीबार केला असून याप्रकरणी संबंधित जवानाला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळीतील वीर जवान प्रथमेश पवार हे दि. 20 मे 2022 रोजी जम्मूतील मिल्ट्री कॅम्पमध्ये गोळी लागून शहीद झाल्याचे पवार कुटुंबाला सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जम्मू- काश्मीर पोलिस दलाकडे सोपविण्यात आला होता. तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर वीर जवान प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एके 47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

21 वर्षीय प्रथमेश पवार या जवानाचा मृतदेह आर्मी कॅम्पमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. यावर पूर्णतः चौकशी करण्यात आली. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. मात्र हत्येच नेमकं कारणं काय आहे हे अजुनही अस्पष्ठ आहे.