… आणि आता नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. शेतकऱ्यांनी मोदी सरकाराच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. “एका चुकीच्या GST करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील,” अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली.

तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “शेतकऱ्यांना कंत्रीटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. यामुळे ना शेतकऱ्यांना मोबदला मिळेल, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment