सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यास चोरट्यानी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीरपणे जखमी आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खांबाला फाटा वस्तीवर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की मग या मागे काही दुसरे कारण होते.हे दुपारपर्यंत स्पष्ठ झालेले नव्हते.

राजेंद्र जिजाराम गोरसे (वय 25) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर
मोहिनी राजेंद्र गोरसे (वय-24) दोन्ही रा. खंबालाफाटा वस्ती, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद असे मृत्यूशी झुंज देत असलेल्या विवाहितेचे नाव आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी दुपारपर्यंत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारीरात्री सर्व परिवाराने सोबत जेवण केले. त्यानंतर मृत राजेंद्र आणि तिची पत्नी मोहिनी दोघेही त्यांच्या खोलीत गेले तर राजेंद्रचे आई-वडील आणि बहीण असे तिघे दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दरम्यान, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात आरोपीनी राजेंद्र यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला व बाजूच्या खोलीत झोपलेल्या आई-वडिलांच्या खोलीला बाहेरून कडी लावली.

दरम्यान राजेंद्र आणि त्यांच्या पत्नी झोपेतून जागे झाले. दोघेही समोर येताच आरोपींनी या नवदाम्पत्यास लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात राजेंद्र रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले. तर तर मोहिनी रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध निपचित जमिनीवर पडली होती. मात्र, आई-वडिलांच्या आरडाओरडने गावकरी धावत त्यांच्या घराकडे येत होते. ते पाहून आरोपीनी धूम ठोकली. गावकऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात अक्षरशः रक्ताचा सडा पडल्याचे पाहून गावकारीही घाबरले. त्यांनी तातडीने आई-वडिलांची बंद खोलीतून सुटका करीत पोलिसांना घटनेची माहिती दिली.माहिती प्राप्त होताच डी. वाय.एस.पी. कैलास प्रजापती, वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजपूत यांच्या पथकाने घटनस्थळ गाठत श्वान पथकाला पाचारण केले. जखमी मोहिणीला रात्री वैजापूर रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर होत चालल्याने तातडीने औरंगाबादेत हलविण्यात आले. सध्या मोहोनीवर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मरेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरातील गावामधील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

सहा महिन्यापूर्वीच झाल होत लग्न

राजेंद्र आणि मोहिनी यांचा सहा महिन्यापूर्वीच लॉकडाऊनच्या काळात लग्न झाले होते. होतकरी तरुण म्हणून त्याची गावात ओळख होती.घरातील कर्ता तरुण होता, भावी आयुष्याची अनेक स्वप्ने हे नवदाम्पत्य पाहत होते मात्र एका हल्ल्याने त्यांची सर्व स्वप्ने भंगली राजेंद्र या जगात नाही तर मोहिनी मृत्यूशी झुंज देत आहे. शिवाय वृद्ध आई-वडीलांचा आधार हिरावला गेल्याने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मध्यरात्री तीन घरात चोरीचा प्रयत्न- प्रजापती

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी गावातील एका घराचा दरवाजा तोडला, तर दुसरे घर रिकामे असल्याने तेथेही चोरीचा प्रयत्न फसला शेवटी त्यांनी गोरसे यांचे घर गाठले आणि मारहाण केली. या मध्ये पतीचा मृत्यू झाला आहे. व पत्नी जखमी आहे. मात्र तिन्ही ठिकाणी चोरी झालेली नाही. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल.
– कैलास प्रजापती, डी. वाय.एस.पी. वैजापूर

Leave a Comment