औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढवली होती. हळूहळू कोरोना रुग्ण संख्येत घट होत होती. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झालीय. बुधवारी मनपा हद्दीत केवळ ३७ रुग्णांची भर पडली तर ग्रामीण मध्ये १०७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतपर्यंत १३८८४२ रुग्ण कोरोनामुक्त असून सध्या २०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी २०४ जणांना (मनपा १४३, ग्रामीण ६१) सुटी देण्यात आली. आजपर्यंत १३८८४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी एकूण १४४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४२३५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३३०१ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २०९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा परिसरातील केवळ ३७ तर ग्रामीण भागातील १०७ रुग्णांचा समावेश आहे. तर बुधवारी आठ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये घाटीमध्ये ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून खासगी हॉस्पिटलमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.