औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोना पळवून लावण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहीम सुरु केली होती. आणि कोरोना महामारीच्या काळात कडक निर्बंध लावले होते. आता निर्बंध शिथिल करून ग्रीन झोन मध्ये असलेले जिल्हे अनलॉक करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन पुन्हा मंगळवार पासून लॉकडाऊन लावण्यात आले असून मंगळवारी दिवसभरात मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची संख्या 384 वर गेली आहे.
औरंगाबाद येथे 91 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामध्ये शहरातील 9 ग्रामीण भागातील 82 जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख 46 हजार 118 वर पोहोचले असून बरे झालेल्या 124 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील 31 जण ग्रामीण भागातील तर 93 जणांचा समावेश आहे. आज पर्यंत 1 लाख 42 हजार 22रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 671 जणांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील घाटी रुग्णालय परिसरात 3,क्रांतीनगर ढोकळे स्टोअर, आदर्श चौक, मन्सूर कॉलनी आणि हर्सूल मध्ये प्रत्येकी 1 बाधित रुग्ण आढळला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात पानगाव खंडाळा आणि विविध ठिकाणी 81 बाधित रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर जिल्हा निहाय वाढलेली रुग्णसंख्या बीड 170, औरंगाबाद 91,उस्मानाबाद 53,लातूर 29,परभणी 25,जालना 11,हिंगोली 5,नांदेड 0 अशी आहे. कोरोनाच्या उपचारा दरम्यान बीडमधील 6, जालना-औरंगाबादेत प्रत्येकी 3, लातूर 2 तर परभणीतील 1 रुग्णाचा तर अन्सार कॉलनी पडेगाव येथील 51 वर्षीय महिला, पैठण येथील 60 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनीतील 55 वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.