NPS आणि अटल पेन्शन योजनेतील ग्राहकांच्या संख्येत झाली 22 टक्क्यांनी वाढ

Pension
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पेन्शन रेग्युलेटर PFRDA अंतर्गत दोन प्रमुख पेन्शन योजनांतर्गत सब्‍सक्राइबर्सची संख्या या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस 22 टक्क्यांहून जास्तीने वाढून 5.07 कोटी झाली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PRFDA) ने गुरुवारी सांगितले की, फेब्रुवारी 2022 अखेरीस, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत विविध योजनांमधील सब्‍सक्राइबर्सच्या संख्येत वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 507.23 लाख झाली आहे.फेब्रुवारी 2021 मध्ये ही संख्या 414.70 लाख होती. वार्षिक आधारावर ही वाढ 22.31 टक्के आहे.

PFRDA नुसार, NPS आणि अटल पेन्शन योजना या दोन योजनांच्या व्यवस्थापनाखालील एकूण पेन्शन मालमत्ता 7,17,467 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यात वार्षिक आधारावर 28.21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. PFRDA च्या आकडेवारीनुसार, NPS केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या कॅटेगिरीमधील सब्‍सक्राइबर्सची संख्या 5 टक्क्यांनी वाढून 22.75 लाख झाली आहे. त्याचवेळी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वार्षिक आधारावर 9.22 टक्क्यांनी वाढली असून ही संख्या 55.44 लाख झाली आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रातही सब्‍सक्राइबर्सच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण सब्‍सक्राइबर्सची संख्या 13.80 लाख झाली आहे. सर्व नागरी क्षेत्रातील सब्‍सक्राइबर्समध्ये 37.70 टक्के वाढ झाली असून या क्षेत्रातील सब्‍सक्राइबर्सची संख्या 21.33 लाख झाली आहे.

NPS लाइट मोडमध्ये पेन्शन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फेब्रुवारी 2022 अखेर 41.88 लाख होती. 1 एप्रिल 2015 पासून या कॅटेगिरीमध्ये कोणतेही नवीन रजिस्ट्रेशन केले जात नाही. APA Lite 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला. फेब्रुवारीच्या अखेरीस अटल पेन्शन योजनेच्या सब्‍सक्राइबर्सच्या संख्येत 29 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण सब्‍सक्रिप्‍शन 3.52 कोटींवर पोहोचली आहे.

NPS म्हणजे काय ?
नॅशनल पेन्शन सिस्टीम किंवा NPS ही एक सरकारी रिटायरमेंट सेव्हिंग स्कीम आहे, जी केंद्र सरकारने 2004 मध्ये सुरू केली होती. सन 2009 पासून ही स्कीम खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठीही खुली करण्यात आली.

अटल पेन्शन योजना काय आहे ?
अटल पेन्शन योजना ही भारतातील नागरिकांसाठी गॅरेंटेड पेन्शन स्कीम आहे. हे 9 मे 2015 रोजी लाँच करण्यात आले. तुम्ही जितक्या कमी वयात या स्कीम मध्ये सामील व्हाल तितका तुम्हाला फायदा होईल.