औरंगाबाद | कोरोना महामारी ने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या तिसर्या लाटेत रुग्ण संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडे सहा हजारापर्यंत असेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 65 टक्क्यांपेक्षा तीव्र लक्षणे असणारे रुग्ण घरीच उपचार घेतील असे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील त्रुटी लक्षात घेता ऑक्सीजन बेड ची व्यवस्था आणि ऑक्सीजन टँकची व्यवस्था करण्यात येत आहे.
कोरोना महामारीची तिसरी लाट तीव्र नसेल ॲक्टिव रुग्ण 50 टक्क्यांनी कमी म्हणजे 6257 एवढे असतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. गरवारे कंपनी तर्फे बालकांसाठी 125 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर एमजीएम रुग्णालयात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर मेल्ट्रोन कोविड सेंटर येथे बालकांसाठी 50 बेड स्वतंत्र असणार असून सिडको येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात देखील 50 बीडचे कोविड प्रसूतिगृह तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर एक सीसीसी, नऊ डीसीएचसी, दहा डीसीएच अशा पद्धतीने रुग्णालय राहणार आहे.