नवी दिल्ली । CBI ने फार्मर्स कोऑपरेटिव IFFCO चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO यूएस अवस्थी तसेच इंडियन पोटाश लिमिटेडचे (Indian Potash) मॅनेजिंग डायरेक्टर परविंदरसिंग गहलोत यांच्यासह त्यांची मुले आणखी काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, खतांच्या आयातीत अडचणी आणि सबसिडीचा क्लेममध्ये गडबड केल्यामुळे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अवस्थी आणि गहलोत या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर CBI ने दिल्ली, मुंबई आणि गुडगावसह या 12 ठिकाणी छापा टाकला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान अवस्थी यांच्या घरातून 8.80 लाख कॅश आणि गहलोत तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 5.76 कोटी रुपयांची एफडी मिळाली. गहलोत यांच्या घरातून CBI ला 14 बँक खाती आणि 19 मालमत्तेचा तपशील मिळाला आहे. गेहलोतची ही मालमत्ता मुंबई, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथे आहे.
खते महागड्या दराने आयात केली जात
CBI ने दाखल केलेल्या खटल्यात अवस्थी आणि गहलोत यांच्यावर असा आरोप केला गेला आहे की,” ते परदेशातून महागड्या किंमतीत खते आयात करत असत आणि सरकारकडून त्यास अधिक अनुदान मिळवत असत. यासह या कंपन्यांचे अधिकारी पुरवठादाराकडून त्यांचे कमिशन घेत असत. ही खते शेतकर्यांना वाजवी दराने विकली जातात आणि कंपन्या सरकारकडून अनुदान घेतात.” CBI चे प्रवक्ते आरसी जोशी यांनी एक निवेदनात म्हटले आहे की,”किसान इंटरनेशनल ट्रेडिंग एफझेडब्ल्यूच्या माध्यमातून अधिक अनुदान देऊन आणि जास्त किंमतीत खते आयात करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.”
प्रमोटर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे
किसान इंटरनॅशनल ट्रेडिंग FZE ही इफ्कोची सहाय्यक कंपनी आहे. या कंपन्या महागड्या दराने खत खरेदी केलेल्या पुरवठादारांकडून कमिशन घ्यायची. एजन्सीने कॅटॅलिस्ट बिझिनेस असोसिएटचे प्रमोटर आणि अवस्थी यांचा मुलगा आणि कॅटलिस्ट बिझिनेस सोल्यूशन्सचे प्रमोटर अमोल यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला आहे. या एजन्सीने काही संचालक पंकज जैन, सुशील कुमार पचिसिया आणि इफ्को यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group