हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग हे अनेक चित्र-विचित्र ठिकाणांनी भरलेले आहे. जगभरात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत ज्यांच्या विषयी ऐकून थक्क व्हायला होते. आज आपण अशाच एका ठिकाणाबाबत माहिती जाणून घेणार आहोत, जिथली लोकं केव्हाही झोपी जातात. हे एक असे ठिकाण आहे जिथे राहणारी लोकं महिनोंमहिने झोपत असतात. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी हे अगदी खरे आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया…
इथे लोकं चक्क महिनोंमहिने झोपतात –
कझाकिस्तानमध्ये येथील कलाची असे या गावाचे नाव आहे. या गावातील लोकं चक्क महिनोंमहिने झोपतात. त्यामुळे या गावाला Sleepy Hollow Village असेही म्हटले जाऊ लागले. बऱ्याचदा इथली लोकं झोपलेलीच दिसून यायची. यामुळेच, इथल्या लोकांवर अनेक संशोधने देखील केली गेली आहेत.
झोपेचे गूढ कधी लक्षात आले –
2010 साली पहिल्यांदा या गावात झोपण्याचे पहिले प्रकरण समोर आले होते. त्यावेळी येथील एका शाळेतील काही मुले शाळेत अचानकच झोपू लागली. हळूहळू असे संपूर्ण गावात होऊ लागले. तेव्हापासून अनेक शास्त्रज्ञ इथे येऊन त्याबाबत संशोधन करू लागले. मात्र अनेक प्रयत्न करूनही शास्त्रज्ञांना यामागील गुपित कळलेले नाही. मात्र 2015 मध्ये हा आजार अचानक संपला असे डेली मेलच्या एका रिपोर्टने सांगितले गेले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते विषारी वायूचा प्रभाव –
कलाची गावातील लोकांच्या या अचानक झोपण्यामागे युरेनियमचा विषारी वायूचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे येथील लोकांना झोपेचा हा विचित्र आजार जडला आहे. या विषारी वायूमुळे येथील पाणी देखील दूषित झाले आहे. तसेच इथल्या पाण्यात कार्बन मोनोऑक्साइड वायू असल्याने इथली लोकं महिनोन्महिने झोपत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.