सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहरातील शिवराज फाटा व वाढे फाटा येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या 4 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून 4 पिस्टल, 8 काडतूस (गोळ्या), मोबाईल व मोटार सायकल असा एकुण 4,18,600/- रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिासांनी दिली.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम यामाहा R15 गाडीवरुन शिवराज फाटा परिसरात देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्याकरीता येणार आहेत. बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरीता पो. नि. अरुण देवकर यांनी सपोनि संतोष तासगांवकर, पोउनि अमित पाटील व विशेष पथकास सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने शिवराज फाटा परिसरात सापळा लावून यामाहा R15 (क्र. एम. एच. 42 ए. व्ही./ 1915) गाडीसह दोन इसमांना पकडून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल, 6 काडतूस (गोळ्या), एक मोबाईल व यामाहा गाडी असा एकुण 2, 16,200 /- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नमुद इसमांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार वाढेफाटा येथे असून त्यांच्याकडेही दोन पिस्टल असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. पोलिसांनी ताब्यातील इसमांसह वाढेफाट येथे जावून तेथे दोन इसमांना पकडून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल, दोन काडतूस (गोळ्या), एक मॅगझीन, दोन मोबाईल, एक स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,02,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. नमुद इसमांचेकडून 4 पिस्टल, 8 काडतूस, 1 मॅगझीन, 3 मोबाईल हॅन्डसेट, दोन मोटार सायकल असा एकुण 4,18,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाणे येथे आरोपीच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे