सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले व फरारी आरोपी पकडण्याबाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. या पथकाला तीन वर्षापासून खूनाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पकडण्यात यश आले आहे. दऱ्या खटपट्या भोसले (रा. मालगांव ता. जि. सातारा) असे ताब्यात गेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फरार आरोपी पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली विशेष पथक तयार केलेले आहे. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमी प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील खूनाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी दऱ्या खटपट्या भोसले (रा. मालगांव ता. जि. सातारा) हा जांब (ता. वाई, जि.सातारा) येथे येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी विशेष पथकास नमुद ठिकाणी जावून आरोपीस पकडून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. विशेष पथकाने जांब गांवी जावून त्याचा शोध घेतला, विशेष पथकातील पोलीसांना नमुद आरोपी पाहिल्याने तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, त्यास पाठलाग करुन पकडले आहे. आरोपीस पुढील कारवाई करीता कोरेगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विश्वनाथ संकपाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाई केली.