हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनानाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातल्या इतर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढीचा प्रमाण हे जास्त आहे. कोणाला बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. तर कुणाला औषधे मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीत हैदराबादमध्ये पुजार्यांना बेड मिळत नसताना एम आय एम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे या पुजाऱ्यांवर योग्य उपचार सुरू झाले. त्यामुळे सध्या कौतुक केले जात आहे.
काय आहे प्रकरण?
हैदराबाद मधील प्रसिद्ध लाल दरवाजा मंदिरातील मुख्य पुजाऱयांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र करोनाच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना बेड उपलब्ध होत नव्हता. तेव्हा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या पुजाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. लाल दरवाजा मंदिराचे हे पुजारी वयोवृद्ध आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना संक्रमणाचा अधिक त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी खासदार ओवैसी यांच्याशी संपर्क केला आणि ओवैसी यांनी देखील त्वरित प्रतिसाद दिला आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असताना घरातील लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण कुठेच बेड उपलब्ध नव्हते शेवटी त्यांनी ही समस्या एमआयएमच्या स्थानिक नेत्यांपुढे मांडली. त्यांच्याच पुढाकाराने त्यांनी आपली समस्या खासदार असदुद्दिन ओवैसी यांना सांगितली अखेर शाली बंडा येथील रुग्णालयात पूजाऱ्यांना बेड उपलब्ध करून देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत पुजाऱ्यांच्या कुटुंबीयांनी देखील खासदार असदुद्दिन ओवैसी यांना मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.