Monday, January 30, 2023

प्रवीण दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात : नवाब मलिकांचा टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. दरेकरांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येत असतात. अशा शब्दात नवाब यांनीही दरेकरांना टोला लगावला.

विरार येथील घटनेबाबत प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेला व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिल. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मलिक म्हणाले, दरेकर हे जॅकेट घालून आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामॅनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत. कोणत्याच राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय तेथील कोणत्याही रुग्णालयाला परवानगी दिली जाऊ शकत नाही.

- Advertisement -

खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, सरकारला कोण घेरतंय हा प्रश्नच आहे. उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. तसेच काही विरोधी पक्ष नेते तर आपल्या कार्यालयातच बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत, असा टोलाही यावेळी. नवाब मलिकांनी लगावला.

वसईत 13 जणांनी प्राण गमवावा लागला हि घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे आणि तिच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी  करणार आहेत. त्यांनी पीडित कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या पद्धतीने भाजपचे लोक उठसूट राजीनामा द्या, पायउतार व्हा अशी मागणी करत आहेत, ते योग्य नाही.